shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंग्रजांनी पाण्याचे साम्राज्य दिले आणि नगर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांनी पाणी सोडले


*खा लोखंडे अँक्शन मोडवर

*घाटमाथ्याच्या पाण्यानंतरच जायकवाडीचा हिशोब

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी 

    धरणे इंग्रजांनी बांधली शेतकऱ्यांना पाणी दिले आणि नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी २००५ चा समन्यायी पाणीवाटप कायदा करून जायकवाडीला पाणी दिले . परंतु आता होणाऱ्या आंदोलनात मी सामील होणार असून पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा असा इशारा खा सदाशिव लोखंडे यांनी दिला . पश्चिमेचे पाणी अडवून घाटमाथ्याचे पाणी आल्याशिवाय जायकवाडीलाच्या पाण्याचा हिशोब नाही असे खा सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

     मंगळवारी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी बोलावलेल्या बैठकीत खा लोखंडे बोलत होते . पुढे ते म्हणाले गोदावरी, मुळा, निळवंडे व भंडारदरा या धरणातील आवर्तनच शेतकऱ्यांसाठी कमी आहे त्यात जायकवाडी भागात ७ ते ८ आवर्तन दिन्यासाठी नगर व नाशिक वर हा अन्याय कशाला . यासाठी लवकरच शेतकऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे .  गोदावरी डावा व उजव्या कालव्याच्या चाऱ्यांचे गुजरात पॅटर्न नुसार काम लवकरच केले जाणार आहे . 
      गोदावरी कालव्यातून जायकवाडीला पाणी सोडले जाणार असल्यामुळे व निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातील शेतकऱ्यांचे बंधारे व तलाव प्रशासकीय अधिकारी भरू देत नसल्यामुळे शेकडो शेतकरी या बैठकीला जमा झाले होते . यावेळी शेतकऱ्यांनी २००५ च्या कायदाचा व हा कायदा तयार करणाऱ्या नेत्यांचा घोषणा देत निषेध व्यक्त केला . हक्काचे पाणी बाहेर जात असल्याने शेतकऱ्यांच्या यावेळी तीव्र प्रतिक्रिया पहावयास मिळाल्या परंतु मी शेतकऱ्यांबरोबर एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे, असे खा लोखंडे यांनी सांगितले . 
       यावेळी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते , शेतकरी संघटणेचे विठ्ठल शेळके, निळवंडे पाटपाणी समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, गंगाधर गमे, नितीन कापसे, गंगाधर चौधरी, उत्तम घोरपडे,  विठ्ठल घोरपडे, सुखलाल गांगवे, राजेन्द्र सोनवणे,  सुरेश तरके,  संपतराव चौधरी, संजय सदाफळ, रावसाहेब थोरात, आज वाकचौरे, महेश देशमुख, राजेंद्र रोहम, राजेंद्र कार्ले यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते . 
---------
निळवंडे डाव्या कालव्यातील शेतकऱ्यांचे तलाव व बंधारे भरून देणार :- खा लोखंडे
डाव्या कालव्यातील कोपरगाव शाखा, तळेगाव शाखा या भागातील गावांना निळवंडेचे पाणी फक्त गावात आले आणि  पाणी दुसऱ्या बाजूला वळून घेतले गावातील तलाव व बंधारे भरले नसल्याने तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया यावेळी लाभधारकांनी व्यक्त केल्या, परंतू आता निळवंडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लाभधारक यांची संयुक्त बैठक बोलावून टेलपासून  संपूर्ण गावातील तलाव व बंधारे भरून देण्याची जबाबदारी मी घेत असक्याचे खा सदाशिव लोखंडे यांनी सांगितले . 
------
निळवंडे अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांवर मुजोरी, शेतकऱ्यांचे ऐकले नाही तर चोप देणार

निळवंडेच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या केलवड, आडगाव, खडकेवाके, तळेगाव, चिंचोली,  वाकडी, पिंपरी निर्मळ गावातील तलाव व बंधारे पूर्ण भरू न देण्यासाठी निळवंडे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांवर मुजोरी करत असल्याचा आरोप निळवंडे समितीचे विठ्ठल घोरपडे यांनी आपल्या यावेळी भाषणात केला . जर अधिकाऱ्यांची दादागिरी चालली तर अधिकाऱ्यांना चोप देणार असे भर बैठकीत शेतकरी म्हणाले. 

निळवंडेचे पाणी गावात येण्यासाठी अजून वर्गणी गोळा करणार
खासदार साहेब तुम्ही गावाच्या शिवेवर पाणी सुरू ठेवा गावात पाणी अडविण्यासाठी आम्ही वर्गणी गोळा करून शेतकऱ्यांसाठी तलावात पाणी साठवू असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले . 


 इंग्रजांनी पाण्याचे साम्राज्य दिले ,२००५ चा समन्यायी पाणीवाटप कायदा पुढाऱ्यांनी केला  परंतु आता राजकारण बाजूला ठेऊन पाणी शेतकऱ्यांना द्यायचे आहे, निळवंडेचा जुना ८ कोटींचा खर्च ५१७७ वर गेला आता चाऱ्या व पोटचाऱ्या काढण्यासाठी अजून २००० कोटी लागणार आहे, परंतु पाणी सध्या शेतकऱ्यांना पूर्णपणे दिले पाहिले बंधारे व तलाव भरण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून पाणी दिले जाणार आहेत . 
-----खा सदाशिव लोखंडे, शिर्डी
close