shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडाळामहादेव सेवा संस्थेचा १०टक्के लाभांश - दिलीपराव पवार

श्रीरामपूर प्रतिनिधी:
 तालुक्यातील वडाळामहादेव विविध कार्यकारी सेवा संस्थेने दीपावली सणानिमित्त सभासदांना १० टक्के लाभांश वाटप सुरू केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव पवार यांनी दिली.

        याविषयी माहिती देतांना श्री.पवार यांनी सांगितले की, माजी आ.भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील आर्थिकदृष्टया सक्षम संस्था म्हणूनही वडाळामहादेव संस्थेचा नावलौकिक आहे. संस्थेचे एकूण १२७५ सभासद आहे. संस्थेकडे सभासदांच्या शेअर्सची रक्कम १ कोटी ९ लाख रुपये असुन दरवर्षी संस्था जिल्हा बँक पातळीवर १०० टक्के वसुलीस पात्र असते. यंदा प्रथमच संस्थेने थकबाकीदार सभासदांनाही १० टक्के प्रमाणे लाभांश वाटप केले आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही १० टक्के बोनस देण्यात आला.

    सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतल्याने सभासदांकडून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी अशोक कारखान्याचे संचालक रामभाऊ कासार, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज गवळी, सचिव जनार्दन नाईक आदींसह संचालक व सभासद उपस्थित होते.

*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close