क्रीडा बातमी
शिर्डी प्रतिनिधी संजय महाजन: धुळे येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे “आखाडा नूतनीकरण” कामाचा शुभारंभ करण्यात आला.
धुळे जिल्ह्याचे मार्गदर्शक व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष तथा भाजपा धुळे लोकसभा निवडणूक प्रमुख, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा. आमदार आदरणीय बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला... ह्या प्रसंगी धुळे तालुका तालीम संघ अध्यक्ष रवींद्र आघाव पैलवान, जिल्हा व तालुका तालीम संघाचे सर्व पदाधिकारी, व्यायाम शाळेचे सर्व मार्गदर्शक कुस्तीगीर, वस्ताद मंडळी व धुळे शहरातील तमाम कुस्तीप्रेमी बांधव उपस्थित होते.

