शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शैक्षणिक बातमी
विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशालेच्या स्काऊट आणि गाईड विभागातर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.श्री सतीश गवळी, सकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री भगवानभाऊ आंबेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली दीपोत्सवाचे आयोजन शालेय परिसरामध्ये करण्यात आले.
प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी दीपोत्सवाचे नियोजन स्काऊट आणि गाईड प्रमुख श्री संजय पालवे, सहकारी शिक्षक श्री गंगाधर गिरमकर, सौ वैशाली तारू, कलाशिक्षक श्री चंद्रकांत जोशी यांनी मिळून केले. श्री.जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने शालेय मैदानावर दिव्याचा भव्य आकार काढून त्यामध्ये रंग भरले.
दीपोत्सवासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते संध्याकाळी आठ दरम्यान कार्यक्रम संपन्न झाला. शालेय इमारत, पत्रावाला ऑडिटरियन आणि शालेय मैदान दिव्यांनी उजळून निघाले होते. एकाच वेळी सर्व दिव्याचे प्रज्वलन करण्यात येणार असल्यामुळे अवघ्या पाच मिनिटांमध्ये हजारो दिवे एकाच वेळी प्रज्वलित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्याच्या प्रज्वलनाने करण्यात आली. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते आकाशात पॅराशुट सोडून कार्यक्रमाची रंगत वाढली.
दीपावली मध्ये फाटले, शोभेची दारू मोठ्या प्रमाणावर उडवली जाते आणि त्यामुळे हवेचे व ध्वनीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते यामुळे प्रशालेतर्फ विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्न करावा आणि आकाशकंदील, किल्ले बनवण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री विजय रसाळ पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, श्रीमती संजीवनी आंबेकर, मुख्यलिपीक श्री कुंडलिक आंबेकर, श्रीमती प्रिती म्हात्रे, श्री.श्रीकांत म्हसकर, श्री.शितलकुमार सुतार, श्री.अमित दाभाडे, संगणक विभाग प्रमुख श्रीमती सविता सिंग मॅडम व शिक्षक वृंद, सेवक श्री विकास आढाव, श्री मुकुंद जगताप, स्काऊट गाईड विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

