अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा: अहमदनगर, बीड आणि लातुर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आर्मड कोर सेंटर आणि स्कुल, अहमदनगर येथे २६ नोव्हेंबर, २०२३ रोजी माजी सैनिकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेजर अंकुर कुमार बशोत्रा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तीनही जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी यांच्या समस्या या मेळाव्यामध्ये सोडविण्यात येणार असुन कँटीन सुविधा, इसीएचएस तसेच वैद्यकीय तपासणीही या मेळाव्यामध्ये करण्यात येणार आहे.
अहमदनगर, बीड आणि लातुर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी अधिकाधिक संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहुन लाभ घ्यावा. याबाबत अधिक माहितीसाठी सुभेदार शंकर चिकणे भ्रमणध्वनी क्रमांक 8168041766 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

