shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पालकमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागाला नवीन वाहनांचे वितरण


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
महसुल विभागातील प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना नव्याने मंजूर झालेल्या वाहनांचे वितरण राज्याचे महसुल, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
शासनाकडून प्राप्त झालेल्या नऊ वाहनांचे उपविभागीय अधिकारी, अहमदनगर, कर्जत तसेच तहसिलदार, पाथर्डी, शेवगांव, अहमदनगर, कोपरगांव, संगमनेर, जामखेड व राहुरी यांना पालकमंत्री श्री.विखे पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.

पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर

*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close