shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिफण' काव्यमहोत्सवाच्या अध्यक्षपदी साहित्यिक रज्जाकभाई शेख यांची निवड


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-- 
त्रैमासिक तिफण, भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नडच्या वतीने कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राज्यस्तरीय 'तिफण' कविता महोत्सव आयोजित केला जातो. महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. या महोत्सवात स्थानिक कविसह राज्यभरातील निमंत्रित कवी , कवयित्री , कवितेचे अभ्यासक सहभागी होतात.निमंत्रितांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील गझलकार, कवी रज्जाकभाई शेख यांची सर्वानुमते संयोजन समितीतर्फे निवड करण्यात आली.

श्रीरामपूर येथील ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख  यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत.शेख यांनी जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम केले आहे. त्यांच्या दीड हजारापेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.विनोदी कथा लेखनातूनही त्यांनी वाचकांना प्रेरणा दिली आहे. राज्यभरातून शेकडो काव्यसंमेलनात  त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आतापर्यंत अनेक वृत्तपत्रे व दिवाळी अंकातून कविता,कथा ,लेख व गझल यांना प्रसिद्धी मिळाली आहे.प्रवरा  कम्युनिटी रेडिओ नभोवाणीवर व्याख्यान, कविता व मुलाखतीचे प्रसारण झालेले आहे.त्यांच्या कवितांना युट्युब, एसीबीएन न्युज,सी9 न्युज,अहमदनगर महानगर न्युज, पारनेर टाइम्स ,भारतीय जनमत पुणे आदी टेलिव्हिजन चॅनेलवर कविता व कार्यक्रम सादरीकरण केले आहे.आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात,अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे,अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे.काव्यक्षेत्रातील यशाबद्दल त्यांचा आतापर्यंत सत्याहत्तर वेळा व्यासपीठावर गौरव करण्यात आला आहे.शिरूर येथील राज्यस्तरीय कविसंमेलन ,श्रीरामपूर तसेच  औरंगाबाद येथील कविसंमेलनाचे ते माजी संमेलनाध्यक्ष आहेत.
त्यांच्या या निवडी बद्दल  प्राचार्य डॉ. विजय भोसले, कविता महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अँड. कृष्णा जाधव, पी.एम. डहाके, डॉ. सीताराम जाधव, डॉ. अंबादास सगट, डॉ. रमेश सूर्यवंशी, डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. रंगनाथ  लहाने, डॉ. संजय गायकवाड, डॉ. शिवाजी हुसे, डॉ. रामचंद्र झाडे, डॉ. सूर्यकांत सांभाळकर, डॉ. अनिता खंडागळे, नाना लहाने, प्रविण दाभाडे, अरुण थोरात, ज्ञानेश्वर गायके, का. का. थोरात, प्रा. रमेश वाघचौरे, शिवनाथ गायकवाड, विवेकानंद सुकाळे, लक्ष्मण वाल्डे, भिमराव सोनवणे, संदीप ढाकणे, संदीप वाकडे, ब्रम्हगिरी गोस्वामी, प्रकाश शहरवाले, श्रीराम दापके, भरत सोनवणे, अनिता राठोड, प्रा. केशरचंद राठोड, अमोल मोकासे , शुभदा देवरे, गितांजली गजबे, आदींनी अभिनंदन केले आहे.
close