shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने वयोवृद्ध नागरिकांसाठी भाऊबीज निमित्त वस्त्रदान तसेच मिठाईचे वाटप

वडाळा महादेव प्रतिनिधी:
 येथील मानवता जिवन कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने  माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी दिवाळी ,पाडवा भाऊबीज या सण उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी  संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल साळवे सर यांच्यावतीने येथील वयोवृद्ध माता भगिनी यांच्यासाठी सण उत्सवानिमित्त संस्थेच्या वतीने वस्त्रदान तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी श्री साळवे सर यांनी प्रास्तविक करत अनाथ गरजू  मुलांची दिवाळी गोड व्हावी यासाठी संघटनेच्या माध्यमातून सण उत्सवाच्या निमित्ताने बाल चिमुकल्या मुलांना दिवाळी फराळ तसेच आश्रमातील माता भगिनी यांच्यासाठी वस्त्रदान करण्यात आले.


प्रसंगी अध्यक्ष अनिल साळवे सर,संस्थेचे मार्गदर्शक पास्टर राजेश कर्डक, उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब निघुट, ॲड. विनोद तोरणे,ॲड. प्रमोद सगळगिळे, उद्योजक  किशनशेठ आहुजा, प्रा. नानासाहेब गांगड. एसटी कंट्रोलर बाळासाहेब भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे, जितेंद्र पाटील, इंजि. अविनाश काळे, श्रीकांत डावखर, उद्योजक सुनील कर्जतकर, गजानन पंडित, प्रा. जगदीश बनसोडे, अनिल गायकवाड, संतोष गायकवाड, पोलिस नाईक नितीन भालेराव, श्री.विनोद चोरडिया, विनोद कुकरेजा, गोरख साळवे, देविदास दळवी,संदिप वाघमारे, दादासाहेब कर्णे आदी पदाधिकारी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील होते. माऊली वृद्धआश्रम यांच्या वतीने  उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देसाई यांनी केले तर आभार श्री. सुभाष वाघुंडे,सौ. कल्पना वाघुंडे यांनी मानले.

वृत्तविशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर 
9561174111
close