shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा..


श्रीरामपूर प्रतिनिधी:
 दि.१४ नोव्हेंबर म्हणजेच बाल दिवस.परंतु दिवाळीच्या सुट्ट्या असल्याकारणाने दि.१४ नोंव्हेंबरला बाल दिवस साजरा करता आला नाही याकरीता, दि. २५ नोंव्हेंबर २०२३ रोजी येथील डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्ध्यापिका सि. सेलिन, ॲडमिनिस्ट्रेटर फा.थॉमसन तसेच शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षकांनी परिपाठ, नृत्य, गायन, नाटक प्रस्तुत केले. शिक्षक विकास सर यांनी गीते गायले तर काझी सर, गुरुदिप कौर कमल, कोमल पारखे यांनी नाटिका सादर केली. तसेच शिक्षिका सोनाली झांजरी,एलिझाबेथ टिचर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. शिक्षिका नंदा पवार, जयश्री ब्राम्हणे, सुनयना भालेराव, सुनिता सोनवणे, शीना कुथुर, जेल्फीना कुथुर निता वराले, वैशाली कदम, यांनी नृत्य सादर केले.

मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांच्या मार्गर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत केलेल्या या कार्यक्रमाचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच कार्यक्रमाची सांगता फा.थॉमसन यांच्या मनोगताने . या कार्यक्रमासाठी स्वाती घोरपडे गणेश पवार, संदिप निबे, दिपक कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.

पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close