श्रीरामपूर प्रतिनिधी
वाघोली - येथील भूमी फौंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष प्रा.कैलास पवार आणि संत साहित्य पुरस्कार विजेते डॉ.बाबुराव उपाध्ये यांचा प्रा.नंदकुमार कुऱ्हे संचालित विजया सरगम ग्रुपतर्फे श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्ती गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांना निगडी प्राधिकरण पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयच्या मनोहर सभागृहात मान्यवर संतसाहित्य अभ्यासक,संतमहात्मे आणि संतगुणी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ.बाबुराव उपाध्ये यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल आणि भूमी फाऊंडेशनतर्फे प्रा.कैलास पवार यांनी अनेक राज्यव्यापी समाजसेवी उपक्रम राबविले,निराधार महिला, वृद्ध,अनाथ विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे वसतिगृह ०३ जानेवारीला सुरु करीत आहेत, त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कुऱ्हे परिवार यांनी नियोजन केले. प्रा. कुऱ्हे यांनी पुणे, श्रीरामपूर येथील समाजकार्य, धर्मकार्य सांगितले. डॉ. उपाध्ये, प्रा. पवार अशी व्यक्तिमत्वे ही संस्कृतीदर्शक आणि समाजपूजक असतात, त्यासाठी हे सत्कार्य वाढले पाहिजे, म्हणून हा सन्मानसोहळा असल्याचे प्रा. कुऱ्हे यांनी सांगितले. प्रा. पवार आणि डॉ. उपाध्ये यांनी स्व. सौ. विजयाताई कुऱ्हे यांचा आदर्श सांगत प्रा. कुऱ्हेसर सेवेचा आदर्श निर्माण केला, त्यामुळेच हा सत्कार म्हणजे दिव्य अनुभूती असल्याचे सांगितले. प्रा. कैलास पवार यांनी आभार मानले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

