shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा आरक्षण करीता सकल मराठा समाजाचे कॅन्डल मार्च मोर्चाचे नियोजन


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवार दि.१ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं ६.३० वाजता हनुमान मंदिर, रेल्वे स्टेशन, श्रीरामपूर येथून कॅन्डल मार्च मोर्चा निघणार असल्याचे सकल मराठा समाज श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढाई पुन्हा सुरू केली आहे. जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून श्रीरामपूर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज आरक्षणाच्या लढाईत उतरले आहे. पहिल्या टप्प्यात श्रीरामपूर शहर बंद यशस्वीपणे करण्यात आले. दुस-या टप्प्यात शहरातील प्रशासकीय भवन तसेच गावोगावी साखळी उपोषण करत मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात आपली लढा तीव्र केला आहे. याच पार्श्वभुमीवर श्रीरामपूरातील सकल मराठा समाजाने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेत कॅन्डल मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले. 

बुधवार दि.१ नोव्हेंबर २०२३ रोजी होणा-या कॅन्डल मार्चची सुरवात रेल्वेस्टेशन जवळील श्री हनुमान मंदिर येथून होणार असून मेनरोड, बेलापूर रोड कॅनॅाल पुल, छत्रपती संभाजी राजे चौकमार्गे, छत्रपती शिवाजी महाराज रोड येथे नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून गांधी पुतळा येथे समारोप करण्यात येणार आहे. 
यावेळी घरातील लहान मुले, विद्यार्थी-विद्यार्थीनी, युवक- युवतींसह महिला-पुरूषांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीरामपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close