shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पतसंस्था अनामत बुडण्याच्या मार्गावर ?


अहमदनगर प्रतिनिधी:
आपल्या शहरासह जिल्ह्यात आजवर कित्येक नागरी सहकारी पतसंस्था आल्या आणि कित्येक पतसंस्था बुडाल्या,अशा या अनेक पतसंस्था बुडाल्याने अनेक ठेवीदारांनी पतसंस्थेत ठेवल्या अनामती देखील बुडाल्या,पुढे अनामती ठेवीदारांचे आपल्या अनामती परत मिळविण्याकरीताचा संघर्ष हा शहरवासीयांना काही नवा नाही, कारण त्यांनी अनेक पतसंस्था या बुडतांना पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत,आजही बुडालेल्या पतसंस्थांकडून आपल्या अनामती परत मिळविण्याकरीता त्यांचा संघर्ष सुरुच असून पुढे त्यांच्या अनामती मिळतात की नाही याबाबत सध्यातर भाष्य करणे उचित ठरणार नाही.मात्र ज्या पतसंस्था बुडण्याच्या मार्गावर असतात ते प्रथमतः ऐनकेन प्रकारे खातेदारांना नवनवीन नियम सांगुन किंबहुना लादून कर्ज नाकारतात, पुर्वीच्या थकीत व नियमित कर्जदारांकडून कशाप्रकारे दिलेली कर्ज रक्कम परत मिळविता येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते,जी पतसंस्था योग्य आणि नियमित रेग्यूलर खातेदारांना देखील कर्ज देण्यात ऐनकेन प्रकारे पतसंस्था नियमावली पलिकडे जाऊन नियमात नसलेले नवीन नियम (म्हणजे बहाणे) लादून योग्य खातेदारास देखील कर्ज देण्याचे टाळत असेल अथवा नाकारत असेल तर समजून घ्यावे की या पतसंस्थेचे पुढे काय होणार आहे?  मात्र यातील काही पतसंस्था चालक महाभाग असेही असतात की स्वतः पदरमोड करुन,सत्कार सन्मान मिळवून अथवा विविध उपक्रमांद्वारे आपली पतसंस्था किती चांगली आहे हे दाखविण्याचा केवेलवाणा प्रयत्न करतात ते केवळ आपल्या पतसंस्थेने गमावलेली विश्वासहर्ता पुन्हा प्राप्त करण्यासाठीच असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

असाचा काही केवीलवाणा प्रयत्न सध्या शहरातील एका पतसंस्था चालकाकडून केला जात आहे याचा अर्थ पुढे या पतसंस्थेचे काय होणार हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची आवश्यकता ती काय? असे तर्क वितर्क सध्या शहरात चर्चिले जात आहे.
क्रमशः
close