shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्याच्या कानाकोपऱ्यातून बाबीर देवाच्या देवदर्शनासाठी भाविकांनी बाबीर गडावरहजेरी लावत केली गुलालाची उधळण.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून  बाबीर देवाच्या देवदर्शनासाठी भाविकांनी  बाबीर गडावर
हजेरी लावत केली गुलालाची उधळण.

अमोल भिसे मित्र मंडळाच्या वतीने गजेढोल स्पर्धा उत्साहात.
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर तालुक्यातील रुई  येथील  अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणारे बाबीर गडावर बाबीर देवाच्या यात्रेसाठी तीन दिवसात  अनेक भाविकांनी दर्शन घेतले यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी  देवदर्शनासाठी हजेरी लावल्याने परिसर बाबीर देवाच्या नावाने चांगभलं म्हणत अलोट गर्दीने फुलला होता.
खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे,  प्रा.आ .राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाईचे प्रमुख दशरथ माने, माजी सभापती प्रवीण माने,  यांसह अनेकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला. ढोल वाजून जुन्या परंपरेला उजाळा दिला. तसेच अमोल भिसे मित्र मंडळाच्या वतीने गजेढोल स्पर्धा घेण्यात आल्या लोप पावत चालत असलेली ही कला या यात्रेत टिकून आहे. मंगळवारी दिवाळी पाडव्यादिवशी निमोणे ता संगमनेर येथुन परंपरेप्रमाणे पायी चालत आलेली बाबीरभक्त साहेबराव मंडलिक यांची हजारो भक्तांची पायीदिंडी रुई गावात आल्यानंतर देवाच्या पालखीने मंदिराकडे प्रस्थान ठेवले. गुलालाची उधळण, तोफांची सलामी व ढोलाच्या निनादात पालखी मंदिरस्थळी आली. यानंतर मानकरी थोरात यांनी देवाचा घट हलविल्यानंतर यात्रेस सुरवात झाली. यावेळी भाविकांनी देवदर्शनासाठी हजेरी लावण्यास सुरवात केली बुधवार हा यात्रेचा मुख्य दिवस होता. यावेळी देवदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभर नवस परतफेडीचा कार्यक्रम झाला.तसेच घोंगडी बाजारपेठेत सुमारे पाच हजार नगांची विक्री झाली. यामध्ये मोठी उलाढाल झाली तसेच घरगुती लाकडी वस्तू व यात्रा बाजारातही मोठी उलाढाल झाली महिलांनी यात्रेमध्ये घरगुती वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसत होते सायंकाळी सविता पुणेकर लोकनाट्य तमाशा कार्यक्रम झाला 
यात्रेच्या तिसर्‍या दिवशी गुरुवारी सकाळी  नवसाच्या बाळांला पाळण्यात बसवून झुला देवुन नवस फेडण्यात आला तसेच भाकणुक व बगाडाचा कार्यक्रम झाला

वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेकरुंना वाहतूक कोंडीला सामोरे जाऊ नये यासाठी उत्कृ्ष्ट नियोजन केले होते  आरोग्य विभागामार्फत येथे बुथ उभारण्यात आले होते. यामध्ये भाविक रुग्णांना चोवीस तास सेवा पुरवण्यात आली.  तहसिलदार श्रीकांत पाटील ,ग्रामपंचायत  व देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी  मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या यामुळे ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक करण्यात आले .
close