श्रीरामपूर प्रतिनिधी:
सध्या सर्वत्र विविध पुरस्कारांचे मोठे फॅड निर्माण झाले आहे, विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देवून सन्मानित केले जाते ही चांगली आणी आनंदाची बाब आहे, यामुळे पुरस्कारार्थीस अधिक जोमाने कामे करण्यास बळ प्राप्त होते.मात्र योग्य आणि कार्यक्षम असलेले जे पुरस्कारास पात्र आहेत त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान झाला तर सर्वत्र त्यांच्या योग्यतेची वाहवाह होणे तसे स्वभावीकच. परंतु जे पुरस्कारासाठी योग्य नाही किंबहुना पुरस्कार मिळावे असे त्यांचे कोणतेच कार्य नाही,अशा लोकांना जर पुरस्कार दिला गेला तर त्या पुरस्कार घेणाराचे सोडा, पुरस्कार देणाऱ्यांच्या देखील कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून ज्याची योग्यता असेल त्यासच पुरस्कार दिले गेले पाहिजे,इतर भलत्या सलत्यांना पुरस्काराची खिरापत वाटणे हे गैर आहे.
कारण त्याच पुरस्काराचे पुढे भांडवल करत मग तो इतरांना मी किती कार्यक्षम म्हणून दाखविण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याने आपले काळे -बेरे लपविण्यासाठीच सदरील पुरस्कार मिळविलेला असतो.
म्हणून योग्य आणि खरोखरच कार्यक्षम असलेल्या व्यक्तीस पुरस्कार दिला जावा आणि जो अकार्यक्षम आहे त्यास पुरस्कारांची खैरात करणे बंद करावे असे जनसामान्यांचे मत आहे.अन्यथा त्या पुरस्काराचा गैरवापर होवून जनसामान्यांच्या डोळ्यात धुळफेक केली जावू शकते याचीही शक्यता नाकारता येवू शकणार नाही.करीता योग्यता बघूनच जे खरोखरच पुरस्कारास पात्र आहे अशा व्यक्तिंचाच पुरस्कार देवून सन्मान केला गेला पाहिजे.

