shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रवास -आकाश सुपारे

जगण्याची गणिते चुकतचं गेली माझ्या
फार दुरचे पाहुन 
मी प्रवास करणार नाही...

वजा होत गेलो नात्यांच्या गुंत्यातुन
जखमां चिघळतचं ठेवल्या आक्रोश करुन 
मी जगणार नाही....

भावनेच्या भावगर्दीत घावलो कितीदा
पावलांना सांगुन ठेवलय 
मी थांबणार नाही...

मी ठरवलय ध्येय्य माझं पण 
मला माहीत आहे 
आलेच मरन तर लांबणार नाही...

वाटच पहात आलोय मी
 स्वप्नांना झोपु दिले नाही 
अन विसरणार नाही...

कायम वादळांशी मनसोक्त 
खेळत आलोय पुढे काय होणार 
तुर्त तरी मी
सांगणार नाही...

चाली, रिती कळल्या मलाही जगाच्या
कायम मुखवटे वाचत 
पुढचा गावं शोधला 
रंगुनही दुनियेच्या मी खंगणार नाही...

वेदनेच्या संवेदना करुन 
आनंदउत्सव भरवला
 काळजात माझ्या मी वेदनेचा 
बाजार मांडणार नाही...

आकाश सुपारे....
9822510254
close