लातूर प्रतिनिधी:
आय एम ए - पॅथॉलॉजिस्ट "लातूर पॅटर्न" संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशन राज्यध्यक्ष डॉ.रविंद्र कुटे यांनी केले.
लातूर येथे जागतिक पॅथॉलॉजी दिना निमित्त दि. ८ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना इंडियन मेडिकल असोसिएशन, आपल्या परिवारातील राज्यभरातील सर्व पॅथॉलॉजिस्ट आय एम ए सदस्यांना विश्वासात घेवून इंडियन मेडिकल असोसिएशनची राज्याची रोग निदानासंबंधीची समिती नियमबद्ध व दीर्घकालीन उपाययोजना करून या क्षेत्रातील अवैध प्रयोगशाळांना चाप बसवेल अशी ग्वाही दिली. जेणेकरून रुग्णांना पॅथॉलॉजिस्टने प्रमाणित केलेले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रिपोर्ट मिळतील व योग्य उपचार होतील. लातूरच्या आयएमए परिवार व परिवारातील पॅथॉलॉजिस्ट यांनी पॅथॉलॉजी लॅब संबंधी अनोखा सबंध राज्याला दिशा देणारा "लातूर पॅटर्न" तयार करावा असे आवाहन केले.
लातूर पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायलाॅजी असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष डाॅ. सचिन इंगळे यांनी आयएमए राज्याध्यक्ष डॉ.रवींद्र कुटे व जिल्हा अध्यक्ष डाॅ. अनिल राठी यांना आयएमए परिवारातील पॅथॉलॉजिस्ट ना प्रवाहात घेवून त्यांचेच अहवाल वैध व ग्राह्य धरावेत अशी विनम्र साद घातली आणि पॅथॉलॉजी चा अनोखा "लातूर पॅटर्न" सबंध राज्यात दिशा देणारा ठरेल असे बोलून दाखवले
डाॅ. उमेश कानडे यांनी तरुण पॅथॉलॉजीस्ट नी चांगले दर्जेदार काम करावे असे आवाहन केले
इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष यांनी लातुर पॅथॉलॉजी असोसिएशनच्या अल्पावधीतील प्रगतीचे मनापासून कौतुक केले. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य आय मे परिवारातील पॅथॉलॉजीस्ट सदस्यांना घेऊनच काम करणार याची ग्वाही दिली
इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर चे अध्यक्ष डाॅ. अनिल राठी यांनी मार्च अखेर पर्यंत लातूर शहरात फक्त पॅथॉलॉजिस्ट असलेल्या लॅब चे अहवाल गृहीत जातील त्यासाठी योग्य उपाय योजना केल्या जातील असे ठोस आश्वासन दिले.
पॅथॉलॉजी मधील नवनवीन तंत्रज्ञान लातूर मथ्ये आणून लातूर जिल्ह्य़ातील रुग्णांना उपलब्ध करुन देणार असल्याचे संघटनेचे सचिव डाॅ. अभिजीत आचार्य यांनी प्रास्ताविकात नमुद केले.
या कार्यक्रमात डाॅ. रमेश जाजु , डाॅ. राम कुलकर्णी,डाॅ शिला कुलकर्णी ,डाॅ सरीता मंत्री यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन तर सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा आदी क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या पॅथॉलॉजिस्ट चा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. स्वप्ना उटीकर व डाॅ. शरयु सुर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. आनंद कलमे यांनी केले.
याप्रसंगी लातूर शहरातील पॅथॉलॉजिस्ट व मायक्रोबाॅयलाॅजीस्ट मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी डाॅ. शिवराज कंठीकर ,डाॅ. संजीवनी मुंडे,डाॅ. रुपेश गुडेवार ,डाॅ. प्रशांत चेगे ,डाॅ. पुनम चिपडे,डाॅ. प्रिया भारती, डां. केशव गिते आणि डॉ. शुभांगी पाटील आदींनी प्रयत्न केले.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

