श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात सुशोभिकरण पेव्हिंग ब्लॉक साठी अकरा हजार रु चा धनादेश सुपूर्त
वडाळा महादेव प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मानवता जिवन कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम या ठिकाणी दिवाळी पाडवा भाऊबीज या सण उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.अनिल साळवे सर यांनी प्रास्तविक करत अनाथ गरजू बाल चिमुकल्या मुलांची दिवाळी गोड व्हावी यासाठी संघटनेच्या माध्यमातून सण उत्सवाच्या निमित्ताने बाल चिमुकल्या मुलांना दिवाळी फराळ तसेच आश्रमातील सुशोभीकरण पेव्हिंग ब्लॉकसाठी अकरा हजार रु चा धनादेश हभप कृष्णानंद महाराज यांना सुपूर्त करण्यात आला प्रसंगी अध्यक्ष अनिल साळवे सर संस्थेचे मार्गदर्शक पास्टर राजेश कर्डक उपाध्यक्ष अँड दादासाहेब निघुट ॲड. विनोद तोरणे ॲड. प्रमोद सगळगिळे उद्योजक किशन शेठ आहुजा प्रा. नानासाहेब गांगड,एसटी कंट्रोलर बाळासाहेब भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे, जितेंद्र पाटील इंजिनीयर अविनाश काळे, श्रीकांत डावखर, उद्योजक सुनील कर्जतकर,गजानन पंडित, प्रा. जगदीश बनसोडे, अनिल गायकवाड, संतोष गायकवाड, पोलिस नाईक नितीन भालेराव, विनोद चोरडिया, विनोद कुकरेजा,गोरख साळवे, देविदास दळवी, संदिप वाघमारे, दादासाहेब कर्णे आदी पदाधिकारी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील होते.श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच ह. भ. प. कृष्णानंद महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून संस्थेच्या माध्यमातून ठिकठिकाणी तसेच आश्रमात वारंवार मदत कार्य होत असून यापुढेही संस्थेचे पदाधिकारी यांनी सदैव आमच्या पाठीशी उभे राहावे असे नम्र आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देसाई यांनी केले तर आभार ॲड. दादासाहेब निघुट यांनी मानले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

