shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त अ.भा.लहुजी सेनेच्या वतीने श्रीरामपूरात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील अखिल भारतीय लहुजी सेनेच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या २२९ व्या जयंतीच्या निमित्ताने श्रीरामपूर येथे गुरुवारी दि.३० नोव्हेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील असलेल्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयासह सुमधुर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रम संयोजक भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व सचिव हनिफभाई पठाण यांनी दिली.

यावेळी होणाऱ्या कार्यक्रमप्रसंगी भारतीय लहुजी सेनेचे प्रमुख संस्थापक व्ही .जी. रेड्डी,माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,लोकसेवा विकास आघाडीचे गणेशसिंग राजपूत, माजी शिक्षण महासंचालक रामचंद्र जाधव,उद्योगपती के.के. आव्हाड, भाजपचे दीपक पटारे, दीपक तूरकणे,तलाठी युनियनचे अध्यक्ष राजेश घोरपडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
    या कार्यक्रमाला सर्वधर्मीय बहुजन समाजातील नागरिकांनी व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह हितचिंतकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कार्यक्रमाचे संयोजक भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल,राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण,कायदेशीर सल्लागार अँड. रमेश कोळेकर, राज्य प्रमुख सुरेश आढागळे,जिल्हाध्यक्ष रज्याकभाई शेख,दक्षिण जिल्हा प्रमुख शांतवन खंडागळे आदि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

*फोटो ओळी*
क्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद यांच्या होणाऱ्या जयंती कार्यक्रमाची पत्रिका ब्रम्हलिन १००८ बाल ब्रम्हचारी महाराज यांच्या  समाधीवर अर्पण करतांना भारतीय लहुजी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब बागुल,हनिफभाई पठाण,शांतवन खंडागळे दिसत आहे (छाया-सुधीर चव्हाण)
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close