राजेंद्र बनकर - शिर्डी
भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक पदी शिर्डीतील सामाजिक कार्येकर्ते भीमराज भालेराव यांची नियुक्ती झाल्याबद्दल खा.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
भविष्यात श्री साईबाबांच्या पावननगरीत एमआयडीसीचा मोठा प्रकल्प होत असून या विषयावर भाजप उद्योग आघाडीचे नवनियुक्त संयोजक भालेराव यांनी खा.सुजय विखे पाटील यांचेशी चर्चा केली. यावेळी नांदुर्खी ग्रामपंचायत चे उपसरपंच विरेश चौधरी , विकास गोंदकर , गणेश कोते , शुभम गोंदकर आदींसह सामाजिक कार्यकर्ते विजय गोडगे आदी कार्येकर्ते उपस्थित होते. तर पक्षाने दिलेल्या संधीचा सर्वसामान्य घटकांपर्यंत लाभ मिळण्यासाठी व जिल्ह्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण भरीव काम करणार असल्याचे यावेळी सत्कार स्विकारताना श्री. भालेराव यांनी स्पष्ट केले.
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561274111

