युवा क्रांतीतर्फे दुर्लक्षितांची दिवाळी इंदापुरात उपक्रम
इंदापूर प्रतिनिधि: युवा क्रांती प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी शनिवार (दि.११)व रविवारी (दि.१२) दुर्लक्षितांची दिवाळी हा उपक्रम राबवण्यात आला.
इंदापूर येथील आय.टी.आय कॉलेजच्या मागील बाजूस असलेले एम. जे .बालविकास केंद्रात वंचित घटकातील बालकांबरोबर तसेच श्रावणबाळ आश्रमातील बालकांबरोबर, कालठण नं.२ गावामध्ये नदीच्या किनाऱ्यावर असणारे मच्छीमार व आदिवासी भागातून ऊसतोडणी कामगारांच्या पालावर जाऊन फुलबाजे व फराळाचे वाटप करून या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. महिला, तृतीयपंथींना फराळ देण्यात आला. तात्काळ मदतीला धावणारे क्रेन चालक, रुग्णवाहिका चालकांना ही फराळ देण्यात आला.बूट पॉलिश करणारे कारागीर, हिंदू स्मशानभूमीतील स्मशानजोगी कुटुंबांना मिठाईचे वाटप करण्यात आले. अनाथ निराधारांना ब्लॅकेट व फराळाचे वाटप करण्यात आले. दर्गा मस्जिद व मदिना मस्जिदमध्ये कुराण पठण करणाऱ्या बालकांना फराळ वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे सचिन परबतें, सायरअत्तार, सौ कल्पना भोर, धरमचंद लोढा, बाळासाहेब क्षीरसागर ,अस्लम शेख, पियूष बोरा, बाळासाहेब धडीवल, उमेश राऊत, ज्ञानेश्वर डोंगरे, रमेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

