इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी दादासाहेब सोनवणे यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर शहरातली माजी नगरसेवक व सामजिक कार्यकर्ते दादासाहेब मारूती सोनवणे यांची इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी इंदापूर शहराचे अध्यक्ष शैलेश पवार ढवळे वतीने नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली सदर निवड पत्र अजित पवार गटाचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे , इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे,इंदापूर तालुका युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, इंदापूर शहर अध्यक्ष शैलेश पवार ढवळे इत्यादी उपस्थित होते.
सदर नियुक्तीपत्रात नमूद केले आहे की,आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. अजित पवार मा. राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे मा पालकमंत्री आ. दत्तात्रय भरणे तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे कार्य व ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचविणे व सार्वजनिक कामांमध्ये भाग घेवून लोकांना मदत करणे तसेच पक्ष संघटना मजबुत करून पक्ष बांधणीचे काम करण्यासाठी प्रयत्न कराल अशी आशा आहे.अशा आशयाचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

