कित्येक वर्षापासून तमिळनाडूतील तिरुपत्तूर जवळील वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी या दोन गावातील ग्रामस्थ फटाके न फोडता दिवाळी साजरी करतात.
कारण त्यांना पशू-पक्ष्यांना दुखवायचे नसते. परिणामी आज वेतांगुडी हे पक्ष्यांचे अभयारण्य हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास झाले आहे.
हे पक्षी स्वित्झर्लंड, रशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका येथून उड्डाण करतात.
या अभयारण्यात वर्षाला १५००० पक्षी येतात. गेल्या अर्ध शतकापासून स्थलांतरित पक्ष्यांच्या २०० हून अधिक प्रजातींसाठी सुरक्षित आणि संरक्षित प्रजनन स्थळ म्हणून या गावांची ओळख आहे.
दिवाळीतच नव्हे, तर सण, उत्सव, लग्न यामध्येही या क्षेत्रात कोणी फटाके फोडत नाहीत..हे अभयारण्य मदुराईपासून ५१ किलोमीटर अंतरावर आहे.
हिंदूंचे आनंदाचे हे सण साजरे होत असतानाच निसर्गाचा वरदहस्त असलेल्या आपल्या देशात ध्वनिप्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण वाढवून आपण आपल्याच भावी पिढीला अंधारात ढकलत आहोत याची चर्चा होते याबाबत अनेक हिंदू मंडळी आक्षेप घेतात. तसेच इतर धर्मियांच्या सणाबद्दल देखील तुलनात्मक चर्चा केली जाते.
बकरी ईदच्या दिवशी प्रचंड रक्तपात होतो आणि नद्यांच्या पाण्यात रक्ताचा प्रवाह वाहू लागतो. पशूंच्या प्रचंड किंकाळ्यांनी वेदनादायी कंपने वाढतात. हे केवळ एका बकरी ईदच्या दिवशी होते असे नाही तर देशामध्ये कायदेशीर कत्तलखाने शासकीय अनुदानाने व बेकायदेशीर कत्तलखाने अनुदानाशिवाय देखील चालू आहेत. यातून निर्माण होणारी वेदना कंपने ही पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडवून टाकत आहेत.
आता पुन्हा मुद्दा येतो तो हिंदूंच्या सणवाराचा. हिंदूंचे प्रत्येक सण हे पर्यावरणपूरक, निसर्गदेवतेची पूजा करणारे आहेत हे लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणासाठी हिंदूंसह अन्य धर्मियांनीदेखील पुढाकार घेत सणावाराच्या नावाने होणारी प्रदूषणाची हानी टाळण्यासाठी आत्मपरीक्षण करायला हवे. बदलायला हवे. ही आज काळाची गरज आहे.
आपल्याकडे उटणे लावायची जी पद्धत आहे त्याचे अनुकरण केले, औषधी व सुगंधी वनस्पतीचा वापर दररोज अंघोळीसाठी केला. रिठ्याचा वापर साबणासारखा केला तर घराघरातून तयार होणारे सांडपाणी हे सुगंधी वनस्पतीयुक्त असे नद्यांपर्यंत पोहोचेल आणि अल्पावधीत केवळ उटणे वापरून आपण नद्या शुद्ध करू शकतो.
सर्वश्रेष्ठ असा जो सुवर्ण धातु, तो धुण्यासाठी, त्याचा मळ काढण्यासाठी केवळ आणि केवळ रिठ्याचाच वापर केला जातो. आपले शरीर तर सुवर्णापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. याचा विचार आपण कधी करणार आहोत काय? केमिकलयुक्त साबणास पर्याय औषधी रिठा वापरून येणाऱ्या भावी पिढीसाठी, नद्या शुद्ध करण्यासाठी उटणे आणि रिठ्याचा वापर करून आपण स्वतःला बदलू या!
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, पुणे
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

