shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय संविधानामुळे देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडता अबाधित - ससाणे


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
भारतीय संविधानामुळेच देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडता अबाधित असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ असे संविधान दिले. संविधानामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. त्यामुळे या संविधानाचा आदर करणे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे.


 यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मा. नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, माजी नगरसेवक के.सी. शेळके, दिलीप नागरे, आशिष धनवटे, अल्पसंख्यांक सेलचे मास्टर सरवरअली सय्यद, रावसाहेब आल्हाट, प्रताप देवरे सर , अमोल शेटे, रितेश एडके, सुरेश ठुबे, अशोक जगधने, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष  रितेश चव्हाणके, रियाजखान पठाण, युनुस पटेल, सुनील साबळे, नजीरभाई शेख, सरबजीतसिंग चूग, बाबा वायदंडे, नवाज जहागीरदार, भैयाभाई अत्तार, लक्ष्मण शिंदे, गणेश काते, संजय गोसावी, जाफरभाई शहा, विशाल साळवे, गोपाल भोसले, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 पत्रकार राजु मिर्जा
(ब्यूरो चिफ इन नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
 समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close