shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोरीचे सुपुत्र ज्ञानदेव शिंदे व निंबोडीचे सुपुत्र संकेत घोळवे यांची (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल विभागाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

बोरीचे सुपुत्र ज्ञानदेव  शिंदे व निंबोडीचे सुपुत्र संकेत घोळवे यांची (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल विभागाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)कार्यकर्ता संवाद मेळावाचे आयोजन  राष्ट्रीय कार्यअध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी सभापती प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,  यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .
यावेळी बोरी गावचे सुपुत्र ज्ञानदेव उत्तम शिंदे व निंबोडी गावचे सुपुत्र संकेत विलास घोळवे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल चंद्रकांत राऊत यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली. 
सदर निवेदन पत्रामध्ये नमूद केले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि आत्तापर्यंत आपण सामाजिक व राजकिय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची नोंद घेऊन आपली पुणे जिल्हा ओबीसी " पदावर निवड करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नेते खासदार शरदचंद्र पवार  यांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम आपणांस सर्वांच्या सहकार्याने करावयाचे आहे. प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील , खासदार  सुप्रियाताई सुळे, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, पुणे जिल्हाध्यक्ष  जगन्नाथ  शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस संघटना अधिकाधिक मजबुत करण्यासाठी आपले सदैव सहकार्य राहील आशा आशियाचे निवेदन पत्र ज्ञानदेव शिंदे व संकेत घोळवे यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.
close