बिजवडी काळेलवस्तीचे रोहिदास गेंड यांची(शरद पवार गट)इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक सरचिटणीस पदी नियुक्ती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)कार्यकर्ता संवाद मेळावाचे आयोजन राष्ट्रीय कार्यअध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी सभापती प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी बिजवडी काळेलवस्तीचे
रोहिदास सर्जेराव गेंड यांची
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि आत्तापर्यंत त्यांची सामाजिक व राजकिय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची नोंद घेऊन रोहिदास गेंड यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभागाच्या " इंदापूर तालुका युवक सरचिटणीस" पदावर निवड
इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन केली.
सदर निवेदन पत्रात नमूद केले आहे की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम आपणांस सर्वांच्या सहकार्याने करावयाचे आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना अधिकाधिक मजबुत करण्यासाठी आपले सदैव सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.आपल्या निवडीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन अशा आशियाचे निवेदन पत्र रोहिदास गेंड यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

