डॉ. वासुदेव नेहरकर व अरुण धपाटे यांनी केज खरेदी विक्री संघातील मुळ सभासदांना नोटीस न देता वगळण्यात आले होते.हे कमी की काय म्हणून त्यांच्या मर्जीतील नवीन सभासदा पण मोठ्या प्रमाणात वाढवले होते. त्या विरोधात डॉ वासुदेव नेहरकर व अरुण धपाटे यांनी सहाय्यक निबंधक यांच्या कडे दाद मागितली होती. केज सहाय्यक निबंधक यांनी या प्रकरणाची चौकशी करून मुळ सभासदांना सभासदत्व बहाल करुन न्याय दिला आहे. या निर्णयामुळे शेतकरी बांधव व सभासदा मध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
केज खरेदी विक्री संघ दिवाळखोरीत निघालेला आहे. शासनाने सदरील खरेदी विक्री संघाला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेले होते. धान्य खरेदी विक्री करण्यास शासनाने बंदी केली होती. सदरील संस्थेचे व्यवस्थापक यांच्यावर देखील भ्रष्टाचार केल्याचे आरोप असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे शासनाने केलेल्या चौकशीतून निर्देशित केले आहे.
डॉ वासुदेव नेहरकर व अरुण धपाटे यांनी जिल्हा सहाय्यक निबंधक यांच्या कडे मूळ सभासदांना मतदार यादीत समाविष्ट करून नवीन सभासद वगळण्यात यावेत अशी तक्रार केली असून सदरील प्रकरणावर सुनावणी सुरू आहे ती प्रलंबित आहे.तसेच खरेदी विक्री संघाशी व, शेतीशी निगडित नसणाऱ्या संस्था मतदारांच्या यादीतून वगळण्यात याव्यात यासाठी कलाम(11)खाली सहाय्यक निबंधक सहकारी संस्था केज यांच्या कडे अपील केले होते त्यावर सुनावणी होऊन सदरील प्रकरणाचा निकाल सहाय्यक निबंधक यांनी दिला असून नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आलेल्या 22 संस्था मतदार यादीतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे केज तालुका खरेदि विक्री संघाची निवडणूक ही रंगतदार होणार असून याकडे सर्व तालुक्यचे लक्ष केंद्रित झाले आहे.

