अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने राज्यातील कलावंतांना मानधन देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. त्यानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १०० कलावंताना मानधन देण्यात येणार आहे. मानधनासाठी जिल्ह्यातील कलावंतांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दि. ३० डिसेंबर २०२३ रोजीपर्यंत जमा करण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कलावंतानी प्रस्तावासोबत ४८,०००/- (अक्षरी रुपये अट्ठेचाळीस हजार) चे वार्षिक उत्पनांचा तहसिलदार यांचा दाखला, कलाकार दस्तऐवज, फोटो, बँके खाते नंबर, रहिवासी दाखला, कलावंत अपंग असल्यास अंपगत्वाचे पुरावे, १५ वर्षाचा वास्तव्याचा दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे. शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती या योजनेस पात्र राहणार नाही, ५० वर्षाच्या वरील कलावंत या योजनेसाठी पात्र आहेत. कलाक्षेत्रातील १५-२० वर्षाचा अनुभव या प्रमाणे अत्यावश्यक असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

