shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली भ्रष्टाचार विरोधी प्रतिज्ञा


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
 राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात येतो. यावर्षी ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन त्यानिमित्ताने येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये भ्रष्टाचार विरोधी प्रतिज्ञा देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांना ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची’ प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी  धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त श्रीमती यु.एस. पाटील, तहसिलदार संजय शिंदे,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनिल इंदलकर यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी:
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close