shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीसह दुय्यम निबंधक कार्यालय क्र.३ सुरु


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
 जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्यातील एक सह दुय्यम निबंधक कार्यालय शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याचे निर्देश राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिले होते.  त्यानुसार अहमदनगर शहरातील तीन कार्यालयापैकी सह दुय्यम निबंधक वर्ग-२ अहमदनगर क्र.३ हे कार्यालय शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायं.६.१५  वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. 

या कार्यालयास मंगळवार व बुधवार या दोन दिवसांची पर्यायी सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती शरद झोंटींग सह जिल्हा निबंधक वर्ग-१ अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close