shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कार उलटून एक ठार ..तीन गंभीर जखमी..जगप्रसिद्ध लोणार सरोवराजवळील किन्ही रस्त्यावरील घटना.....!

 लोणार :- शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह

ठाणे जिल्ह्यातून पर्यटक लोणार सरोवर पहाण्यासाठी आले असता सराेवर पाहून आपल्या गावाकडे जात असलेल्या पर्यटकांची कार उलटल्याने एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाेणार सराेवराजवळ किन्ही रस्त्यावर १८ नाेव्हेंबर २०२३ राेजी घडली. अपघातानंतर कारने तीन ते चार वेळा पलटी  मारल्याने झालेल्या दुर्दैवी घटनेत सूरज शिवाजी गुडवे (२५, रा. ठाणे) यांचा जागीच मृत्यू झाला.  
      घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई व ठाणे येथील पर्यटक इनाेव्हा कार (एमएच ०१ एएक्स ९८९८) ने सकाळी शेगाव येथे दर्शन घेऊन लाेणार सराेवर पाहण्यासाठी आले हाेते. सराेवर पाहिल्यानंतर ते मुंबईकडे परत जात हाेते. दरम्यान, लाेणारवरून समृद्धी महामार्गाकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या खाली उतरली आणि दाेन ते तीन वेळा पलटी मारली. या अपघातामध्ये सूरज शिवाजी गुडवे यांचा मृत्यू झाला तर सूर्यकांत शिवाजी गुडवे (२७), निहाल संदीप सुर्वे (१ वर्ष), साहिल संजय गुडवे (२०), नीता संदीप सुर्वे (३३) हे गंभीर जखमी आहे. जखमींना जालना येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनास्थळावर पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, संतोष प. चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक राजेश घोगरे आदींनी भेट देऊन जखमींना तातडीने उपचारार्थ पाठवले. पुढील तपास लोणार पोलिस करीत आहेत.
close