shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मिळालेल्या पदाचे सोने केल्याशिवाय राहणार नाही - भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब चिडे


माळवाडगांव प्रतिनिधी:
माळवाडगांवचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तर पारदर्शक विकास मंडळाचे नानासाहेब आसने, प्रसाद जगरूपे, लताबाई आसने, आणि संगीता मोरे यांची ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. चिडे बोलत होते.

        श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयसीआयसीआय बँकेचे रिजनल मॅनेजर राजेंद्र आसने, भाजपचे तालुका उपाध्यक्ष डॉ शंकरराव मुठे, पैस ऍग्रो उद्योग समूहाचे दिपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारंभात श्री.चिडे बोलत होते. 
     यावेळी बोलतांना ते म्हणाले की गावासाठी मागील पाच वर्षाच्या काळात कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे केली त्यामध्ये प्रामुख्याने गावाची पाणी पुरवठा योजना करणे हे माझे आणि तात्यांचे ध्येय होते, ही योजना झाली नसती तर मला सत्ता मिळून देखील काहीच उपयोग झाला नसता मात्र राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे सदर योजना पूर्णत्वास गेली याचा मनस्वी आनंद होतो आहे यापुढील काळात देखील मिळालेल्या पदाचा उपयोग गावाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असून तसेच आपल्या काळात आपण गावातील सर्व परिसरात भरीव विकास कामे केली, आपल्या सारखे पारदर्शक विकास कामे गावात कुणीच करू शकत नाही, अथवा कोणी करून दाखवावा असा टोलाही यावेळी त्यांनी विरोधकांना लगावला.
          आपल्या उमेदवारांवर ज्या मतदारांनी विश्वास दाखवला आणि मोठे मताधिक्य मिळवून दिले त्या सर्व मतदारांचे श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने यांनी आभार मानले तसेच गावातील विकास कामासाठी आपण सत्ता असो किंवा नसो कायमच प्रयत्नशिल राहणार असून आपल्या ज्या उमेदवारांचा पराभव झाला त्यांनी खचून न जाता पुन्हा तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आयसीआयसीआय बँकेचे रिजनल मॅनेजर राजेंद्र आसने, भाजपचे तालुका उपाध्यक्ष डॉ.शंकरराव मुठे, नूतन सदस्य नानासाहेब आसने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी पोलीस पाटील श्रीधर आसने, बाबासाहेब आसने, जालिंदर आबा आसने, बाबुराव दळे, भारत राष्ट्र समितीचे बबनराव आसने, सुभाष मोरे, भाऊसाहेब आसने, भाऊसाहेब मोरे, कांचन गायकवाड, भाऊसाहेब आढाव, विठ्ठल अनुसे, अशोक आढाव, बबनराव लटमाळे, सचिन आसने, शरद खाजेकर, बाबासाहेब मोरे, दत्तात्रय मोरे, अमोल मोरे, प्रदीप भैय्या आसने, पिंटू अनुसे, महेश आसने, साहेबराव कर्पे, किसनराव आसने, दिलीपराव हुरुळे, माजी सदस्य रावसाहेब काळे, अनिल आसने, तात्यासाहेब चौधरी, गोरख आसने, दिलीप आसने, राजेंद्र आसने, शरद आसने, जगन्नाथ आसने, घोगरे, संजय दळे, मच्छिंद्र गाढे, रमेश डहाळे, आप्पासाहेब काळे, राजेंद्र हुरूळे, अशोक आसने, सुधिर आसने, संतोष आसने, पत्रकार विठ्ठलराव आसने, पत्रकार संदिप आसने आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बाबासाहेब मोरे यांनी केले होते तर सूत्रसंचालन रवींद्र शिंदे यांनी केले आणी आभार बाबासाहेब मोरे यांनी मानले.


*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*
close