बी.आर.चेडे - शिरसगांव
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रश्नी ग्रामपंचायत निवडणुकीचे विजयाचे शिल्पकार गणेशराव मुदगुले यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री,ना. राधाकृष्ण विखे पा.यांची भेट घेऊन समक्ष चर्चा केली व तसे निवेदन विठ्ठलराव लंघे,दीपक पटारे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.
त्यामध्ये रस्त्याची कामे,तसेच डीपीटीसी मध्ये शिरसगांव - निमगाव खैरी रस्ता. शिरसगांव - ब्राम्हणगाव रस्ता, कुटे हॉस्पिटल ते वळदगाव हे रस्ते सुचविले.इंदिरानगर भागात गटारीचा मोठा प्रश्न आहे.आदी समस्या संदर्भात ना.विखे पाटील यांनी ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार ना.राधाकृष्ण विखे पा,,खा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे गणेशराव मुदगुले यांनी सांगितले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

