shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऑस्ट्रोलिया येथे जाणाऱ्या डॉ. मेहकरकर परिवाराचा विश्वलक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे सत्कार


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश मेहकरकर, सौ. आशा प्रकाश मेहकरकर आणि त्यांचे चिरंजीव बालरोगतज्ज्ञ डॉ. शेखर मेहकरकर हे आज दि.२७ नोंव्हेंबर २०२३  रोजी पर्थ ऑस्ट्रेलिया येथे जाणार असल्याने, या परिवाराच्या वैद्यकीय कार्याबद्दल येथील विश्वलक्ष्मी प्रतिष्ठान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संमोहनतज्ज्ञ व श्रीरामपूर साहित्य परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. रामकृष्ण जगताप, रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले महाराज यांचे अभ्यासक, स्वाध्याय परिवाराचे माजी प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे यांनी ऑस्ट्रोलियाला जाणाऱ्या डॉक्टर मेहकरकर परिवाराचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

अनेक वर्ष ऑस्ट्रोलियात वास्तव्य करणाऱे डॉ.शेखर मेहकरकर व डॉ.सौ.पूजा मेहकरकर यांनी नावलौकिक मिळविला आहे. आपल्या आईवडिलांसह ऑस्ट्रोलिया प्रवास करणाऱ्या परिवारास शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठान संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.सन्माचिन्ह, शाल, बुके देऊन सर्वांचे सत्कार केले.सुरेश कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. उपाध्ये यांनी केले. सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close