shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहर उपाध्यक्षपदी निवडीबद्दल भैय्याभाई अत्तार यांचा सत्कार

श्रीरामपूर प्रतिनिधी:
जनसामान्यांना ज्वलंत प्रश्नांसाठी  दक्ष राहुन त्यांच्या समस्या दुर करण्याकामी सदैव तत्पर असलेले शहरातील वॉर्ड क्र.२ मधील सामाजिक कार्यकर्ते भैय्याभाई अत्तार यांची अ.भा. काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या श्रीरामपूर शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गरीब नवाज फाऊंडेशन आणी रियाजखान पठाण मित्र मंडळाच्यावतीने  त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या या नुतन जबाबदारी मुळे त्यांच्या कार्यांना अधिक बळ प्राप्त होणार आहे.

मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे भैय्याभाई अत्तार यांची कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या सत्काराप्रसंगी श्रीरामपूर न.पा.चे माजी नगरसेवक हाजी मुख्तारभाई शाह,अत्तार समाजाचे अध्यक्ष इसहाकभाई अत्तार,रियाजखान पठाण, अहमदभाई शाह, अजीजभाई अत्तार,सलीमभाई अत्तार, बाबा वायदंडे, गणीभाई टिनमेकर, युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष जाफरभाई शाह, कलीमभाई अत्तार, अकबरभाई कुरेशी,राजू भाऊ, अकील शाह आदी मान्यवर उपस्थित होते.


पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 956117411
close