shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार लहु कानडे यांच्या हस्ते शिरसगावात आज रस्ते विकास कामांचे भुमिपूजन संपन्न...!


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील मात्र शहरालगत असलेल्या शिरसगांव याठिकाणी तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या हस्ते आज रस्ते विकास कामांचे भुमिपूजन संपन्न झाले. 


आमदार लहू कानडे यांच्या हस्ते ग्रामीण विकास कार्यक्रम लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत  श्रीरामपूर लगत शिरसगांव हद्दीतील भोंगळवस्ती अंतर्गत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या रस्त्याच्या कामांसाठी रु. २० लक्ष  व शिरसगांव गावांतर्गत डावखर नगर येथील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी रु. ३० लक्ष या कामाचे भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रवीण भाऊ काळे, सतीश बोर्डे, राजेंद्र अवताडे, सुरेश पवार, कार्लास साठे सर* आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी येथील ग्रामस्थ व नागरिकांनी आमदार लहू कानडे यांचे आभार मानले.

पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close