श्रीरामपूर प्रतिनिधी:
भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.कैलास पवार व पदाधिकारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांची भेट घेतली.यावेळी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा कार्य अहवाल ग्रंथ भेट दिला.हे कार्य पाहता डॉ.काळकर यांनी समाधान व्यक्त केले.तसेच भूमी फाउंडेशन चे कार्य मोठ्या ताकदीने अजून पुढे गेले पाहिजे.
यासाठी सहकार्याची सद्भावना दाखवली.पुढे ते म्हणाले की सुदैवाने महाराष्ट्राला थोर संतांची अमृतवाणी ,शिकवण व थोर महापुरुषांच्या विचाराचा वारसा लाभलेले राज्य म्हणून ओळख आहे. खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या जन्म तिथी साजरी करण्याबरोबरच त्यांच्या विचाराचे पाईक होणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.आपण कुटुंबासाठी, कुटुंब आपल्यासाठी आणि देश सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.आज प्रत्येक युवक संगणक युगात वाचनापासून दूर जाताना दिसत आहे.संगणक ज्ञानाबरोबर वाचन देखील तितकेच महत्त्वाचे आहे.भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था/ संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर अनेक सेवाभावी लोकांच्या मदतीने सुरू असलेले भूमी फाउंडेशन या संस्थेचे राज्यव्यापी सेवाभावी कार्य हे निश्चित अत्यंत गौरवस्पद आणि उल्लेखनीय कार्य आहे.संस्थेचे अध्यक्ष कैलास पवार आणि पदाधिकारी यांनी गरजू मुलींकरिता पुणे येथे वसतिगृह सुरू केले हा स्तुत्य उपक्रम आहे.या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाकरिता कैलास पवार यांना विविध स्तरावरून आज सहकार्य होणे हे अत्यंत गरजेचे आहे.असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी केले.तसेच यावेळी भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांचे आभार मानले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

