वालचंदनगर येथे संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साद फाऊंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्ट (एनजीओ)च्या वतीने संविधान सन्मान दौड केले आयोजन .
इंदापूर प्रतिनिधी: वालचंदनगर येथे भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साद फाऊंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्ट (एनजीओ)च्या वतीने संविधान सन्मान दौड चे आयोजन आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.नम्रता तळेकर ,विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य अहिरे सर,वर्धमान विद्यालयाचे उपप्राचार्य निकम सर,उबाळे सर,अहिवळे सर,वालचंदनगर चे सरपंच कुमार गायकवाड,उपसरपंच रोहित झेंडे,वालचंद विद्यालयाचे प्राचार्य सर्वंगोड सर,भारत चिल्ड्रन्स ॲकडमी चे प्राचार्य क्षिरसागर सर, व्होकेशनल एज्युकेशन लासुर्णे चे सोनवणे सर,भोसले सर,चव्हाण सर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद झेंडे, माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड,वालचंदनगर ग्रामपंचायत सदस्य पांढरे,राष्ट्रवादीचे गणेश धांडोरे,आकाश पवार,रवि जाधव, वर्धमान विद्यालयाचे भोरे सर, ज्योत्स्ना गायकवाड मॅडम,कळंबच्या पोलीस पाटील सौ.करडे,पाखरे सर, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे गोपनीय विनोद पवार व अनेक शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
प्रचंड उत्साहात झालेली ही स्पर्धा चार गटांत झाली.१७ वर्षांवरील मुलींच्या गटात १)२)३) यांनी क्रमांक पटकावले तसेच १७ वर्षांखालील गटात १)२)३)या मुलींनी क्रमांक पटकावले.
त्याचप्रमाणे १७ वर्षांवरील मुलांच्या गटात १)२)३) यांनी तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात १)२)३) यांनी क्रमांक पटकावले.
उत्कृष्ट नियोजन, वालचंदनगर पोलीस स्टेशन चा चोख बंदोबस्त, प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे यांची तप्तर सेवा या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत सुरवातीला संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ए पी आय साळुंखे यांच्या हस्ते पुजन करून सुरवात झाली.मान्यवरांच्या हस्ते संविधान पुस्तकिचे पुजन व दिपप्रज्वलन केले. नंतर राष्ट्रीय गीत गाऊन साळुंखे साहेबांनी उद्देशिका वाचन करून सगळ्यांना ग्रहीत केले .
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे यांनी प्रास्ताविक केले तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ नम्रता तळेकर, साळुंखे सर, सरपंच गायकवाड यांनी सर्वांना प्रबोधित केले.
एकुण ९ विद्यालय, महाविद्यालय यांमधील २०० धावपटुंनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, स्वयंसेवक, कर्मचारी, सचिव यांनी मेहनत घेतली.

