*कळंब - वालचंदनगर परिसरात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा...*
इंदापूर प्रतिनिधी: भारतीय संविधान दिनानिमित्त आज कळंब - वालचंदनगर परिसरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संविधान दिनाचे औचित्य साधून कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वाचनालयाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.तसेच २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह सुहास डोंबाळे,रामचंद्र कदम,सरपंच विद्या अतुल सावंत,राजेंद्र डोंबाळे, योगेश डोंबाळे,संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अविरत परिश्रम घेऊन आपल्या देशाला संविधान दिले असून खऱ्या अर्थाने संविधानामुळेच आपल्याला समानतेचे हक्क-अधिकार आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.त्यामुळे आजचा संविधान दिन म्हणजे हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या अखंड देशवासीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असल्याचे
आ.भरणे म्हणाले.

