इच्छुक उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्यामार्फत १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, पारनेर येथे पंडीत दीनदयाल उपध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नि.ना. सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
रोजगार मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्हयातील २० ते २५ नामांकित कंपन्यांचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवरांची निवड करणार आहेत. एसएससी,एचएचसी, सर्व शाखेतील पदवीधर (बीए/बी. कॉम/बी. एससी/इंजिनिअरींग/ कृषी/फार्मासिटीकल), आयटीआय (सर्व ट्रेड) व वैद्यकिय (नर्सिंग) इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कंप्युटर इ. क्षेत्रामध्ये डिप्लोमा/डिग्री झालेल्या उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in यावेबसाईटवरतसेच https://forms.gle/dfyTGCN4qw9auXfR6 या लिंकवर आपली नाव नोंदणी करून पात्रतेनुसार उद्योजकांकडे अप्लाय करावे.
याबाबत अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 0241-2995735 किंवा रोजगार मेळावा समन्वयक वसीमखान पठाण मो. नं. 9409555465, मच्छिंद्र उकिरडे मो. नं. 9595722424, संतोष वाघ मो. नं. 8830213976, बद्रिनाथ आव्हाड मो. नं. 9420725280, योगेश झांजे मो. नं. 9588408890, आकाश बोठे मो. नं. 9699865040 व सुशिल नलवडे मो. नं. 9307322919 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी,स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

