shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जि.प.शिक्षण विभागाच्या लेखी आश्वासनंतर शिक्षकांचे विविध मागण्यांबाबतचे उपोषण स्थगित


अहमदनगर प्रतिनिधी:
 प्रोटॉन संघटना व शिक्षक प्रशिक्षक संघ यांच्या संयुक्त  विद्यमाने अहमदनगर जिल्हा परिषद याठिकाणी दि.१६ नोव्हेंबर २०२२ पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते.

आज दिनांक १७ नोंव्हेंबर २०२३ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी श्री.बुगे अधीक्षक सुभाष कराळे, वेतन अधीक्षक रामदास म्हस्के ,नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्राचार्य संभाजी पवार सर, प्रा.माणिकराव विधाते यांनी अन्यायग्रस्त,अपमानग्रस्त शिक्षक बंधू भगिनींची उपोषण स्थळी भेट घेवून सर्व शिक्षकांच्या भावना आणि अडचणी समजून घेतल्या. या वेळी काही अन्यायग्रस्त शिक्षकांच्या भावना अनावर होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील आलेत. मिलिंद काळपुंड सर व प्रा.प्रशांत म्हस्के सर यांनी अन्यायग्रस्तांच्या विविध अडचणी या ठिकाणी मांडल्या. सेवा जेष्ठतेचा प्रश्न,मेडिकल बील, पीएफ बिल,वरिष्ठ, निवड श्रेणी मान्यता, सेवाखंड,पदोन्नती,पगार वेळेवर न होणे, सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न. अशा विविध प्रलंबित प्रश्नांवर यावेळी साधक - बाधक चर्चा करण्यात आली. शिक्षणाधिकारी यांनी  आंदोलनकर्त्यांना आंदोलन स्थगित करण्यात यावे असे सांगितले. परंतु उपोषणकर्त्या शिक्षकांच्या तीव्र भावना पाहता लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही ही ठाम भूमिका प्रशांत म्हस्के सर व काळपुंड सर यांनी घेतली. साधारण अडीच तास चर्चेनंतर उपोषणकर्त्यांना शिक्षणाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषण स्थगित करण्यात आले.

येत्या आठ ते पंधरा दिवसात सर्व प्रश्न संबंधित शिक्षण संस्था व्यवस्थापक व अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन  शिक्षणाधिकारी यांनी दिले. उपोषणकर्त्यांपैकी  प्रोटान चे राज्य सरचिटणीस मिलिंद काळपुंड, राज्य अध्यक्ष शिक्षक प्रशिक्षक संघाचे  प्रा. प्रशांत म्हस्के,कला संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव अकोलकर, खाजगी माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पानसरे सर, पी.बी.गायकवाड, जगदाळे एम.ए. मॅडम, सदाफुले मॅडम, काळोखे मॅडम ,रंगनाथ मोरे, चव्हाण राजेंद्र, शिवाजी गुंजाळ,खरचंन सर,वाटमारे प्रविण,पवार कलमेश,धनवडे आर.एम., डेव्हिड कानडे, सुभाष जावळे, तापकीर सर असे अनेक उपोषणकर्ते व कार्यकर्ते आदि यावेळी उपस्थित होते.
बातमी विशेष सहयोग

पै.सी.बी.पानसरे (सर)
संकलन:
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर 9561174111
close