धनत्रयोदशी सण
पूजा आरोग्यशीलेची
निरामय जीवन हॆ
प्रार्थना धन्वतरीची
आयुर्वेदिक पूजन
खरा आरोग्याचा मंत्र
जीवनाचा सदमार्ग
आहे मांगल्य पवित्र
धनत्रयोदशी सण
धनपर्व घरीदारी
मन ठेऊ प्रसन्न हे
आयुर्वद मनू तारी
आरोग्यदायी जीवन
सांगे पवित्र हा सण
घेऊ संदेश सात्विक
होईल निर्मळ मन
अमृतमयी वाटेचा
मंगलमय प्रवास
धनत्रयोदशी दिन
संस्कृती ही आसपास
लक्ष्मीची पावलं दारी
सरस्वतीमाता मनी
विद्याधन सर्वश्रेष्ठ
ज्ञान -विज्ञान ध्यानी
आयुर्वेद ग्रन्थ श्रेष्ठ
भारतीय ज्ञान पूजा
होती रोग सदा नष्ट
पंतजली आहे राजा
पंचमहाभूते जाणू
माती,पाणी,हवा,तेज
आहे आकाश त्यात
करू उपयोग रोज
धनवंत आरोग्याचा
तोच खरा जीवनाचा
आहे रक्षक देहाचा
आयुर्वेदी जगण्याचा
धनत्रयोदशी पूजा
आहे संस्कृतीची साक्ष
मन, शरीर निर्मळ
दीप लावू लक्ष लक्ष !
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

