shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

३७ व्या नॅशनल गेम्समध्ये श्रीरामपूरच्या विद्यार्थ्यांची उतुंग गगनभरी कामगीरी !


*३७ व्या नॅशनल गेम्समध्ये एलिना अजय तेजानी, हर्षल सोमनाथ घुगे,आनंद पटेकर‌ यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याला आणखीन एक सुवर्ण व रोप्य पदक


*३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये हर्षल सोमनाथ घुगे,आलीना अजय तेजानी  व आनंद जोसेफ पटेकर यांच्या कामगिरीने अहमदनगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्याचे नाव उंचावले

श्रीरामपूर प्रतिनिधी:
 रोल बॉल खेळाचे राजू दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३० ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर या दरम्यान ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये , रोलबॉल या खेळाच्या स्पर्धा पार पडल्या. 

या स्पर्धेत आलिना तेजानी हिने 
नेत्र दीपक कामगिरी करून महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले तर हर्षल घुगे याने चुरशीची लढत देत महाराष्ट्र संघाला ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये रोप्यपदक मिळवून दिले. 
तसेच ३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे व्यवस्थापक आनंद पटेकर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून महाराष्ट्र संघाला सुवर्णा पथकाचे दावेदार बनविले.
हर्षल सोमनाथ घुगे,आलिना अजय तेजानी व आनंद पटेकर यांच्या या कामगिरीमुळे अहमदनगर जिल्ह्या सह तालुक्याचे नाव उंचावले आहे.
तसेच अमन प्रशांत अलग व वेदांत सोमनाथ घुगे यांनी नॅशनल गेम्स मध्ये रोल बॉल या खेळात गोवा राज्याच्या संघातून खेळले.
३७ व्या नॅशनल गेम्स मध्ये रोल बॉल या खेळाचे व्यवस्थापक आनंद पटेकर हे सेंट झेवियर्स शाळेचे क्रीडा शिक्षक आहेत व एलिना अजय तेजानी,हर्षल सोमनाथ घुगे ,अमन प्रशांत अलग व वेदांत सोमनाथ घुगे हे सर्व खेळाडू सेंट झेवियर्स शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय रोल बॉल प्रशिक्षक अमित पाटील, हेमांगिनी काळे, संजय कोल्हे, ऐश्वर्या मदने, दादासाहेब बोर, आनंद पटेकर, प्रभाकर वडवेराव, नितीन तमनर व पुष्पा कोळगे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व खेळाडूंना , प्रशिक्षकांना व व्यवस्थापक यांना सेंट झेवियर्स शाळेचे प्राचार्य फादर टायट्स, रोल बॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, एशिया, भारतीय व महाराष्ट्र रॉल बॉल संघटनेचे सचिव प्रताप पगार, चेतन भांडवळकर, आनंद यादव , श्रीरामपूर तालुका रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष राजेश अलग यांनी  शुभेच्छा दिल्या आहेत.

*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close