जितेंद्र मोरघा - जव्हार
मोखाडा तालुक्यातील किनिस्ते ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या मध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार पंकज पंढरीनाथ शिंदे यांची ८ पैकी ६ मतांनी निवड करण्यात आली.
सरपंच पदासाठी काही दिवसांपूर्वी योगेश रामदास दाते यांनी तब्बल ४२७ मतांनी विजय संपादन केला होता, तसेच सदस्य पदासाठी बाळकृष्ण शिंदे, कविता मडके,निता दाते,भारती शिंदे यांनी सदस्य पदी दणदणीत विजय मिळवला होता.त्यामुळे किनिस्ते ग्रामपंचायत मध्ये शिवसेना पक्षाची एक हाती सत्ता मिळाली आहे.आज निवडणूक प्रक्रिया अभयराज मुतडक निवडणूक अधिकारी यांनी पार पाडली.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले की जनतेने प्रचंड मतांनी आपणास निवडुन दिले असुन सर्व सामान्य माणसाची कामे ग्रामपंचायत मध्ये झाली पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. नवनिर्वाचित सरपंच योगेश दाते यांनी सांगितले की ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकासकामांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत व प्रामाणिक काम करुन लोकांचीच कामे करु.या वेळी सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

