shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मख़दुम सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे भारतरत्न मौलाना आझाद यांना अभिवादन


*मौलाना आझाद यांनी शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून अंमलात आणले - शौकतभाई तांबोळी

अहमदनगर प्रतिनिधी:
भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले.  व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली. त्यामुळे शिक्षण विस्ताराचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकतभाई तांबोळी यांनी केले.

स्वातंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व मराठा सेवा संघाच्या वतीने अहमदनगर किल्ल्यामध्ये साडेतीन वर्ष बंदिस्त असणाऱ्या खोलीत मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकतभाई तांबोळी, कॉ.प्रा.डॉ. मेहबूब सय्यद, संजय झिंजे, मराठा सेवा संघाचे इंजि. अभिजीत वाघ, मौलाना आझाद उत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खालील, सचिव निसार बागबान, सलीम सहारा, गाईड अमोल बास्कर, पत्रकार रियाजभाई शेख, पत्रकार अफजलभाई सय्यद, ठाकूरदास परदेशी, आर्कि. फिरोज शेख, तनवीर चष्मावाला, इमरान खान पत्रकार हाजी अन्वरभाई, सातपुते सतीश, शफकत सय्यद, विजय कदम, अनंतराव गारदे, जाकीर शेख, जमीर शेख, बशीर शेख, सतीश निमसे आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कॉ. प्रा. डॉ. महेबूब सय्यद म्हणाले, शिक्षणाचे महत्व विशद करतांना संसदेत मौलाना आझाद म्हणाले होते की, देशाचे अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्रानंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे. त्यांचे असे मत होते की, देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये तर देशाच्या नवीन पिढीची जडण घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच सुरुवातीच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट दोन कोटीचे होते. ते १९५८ साली ३० कोटींचे झाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलली. अनेक नविन शैक्षणिक संस्था निर्माण करुन विकसित केल्या असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी तर सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. आभार भैरवनाथ वाकळे यांनी मानले. 

वृत्तविशेष सहाय्य 
*ज्येष्ठ पत्रकार आबीद खान- अहमदनगर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close