shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

२६ नोव्हेंबर रोजी साकरवाडी येथे पेन्शनर्स मेळावा

बी.आर.चेडे - शिरसगांव
इपीएस ९५ पेन्शनधारकांचे पेन्शनवाढ आदी प्रलंबित प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्यासाठी देशभर आंदोलने करण्यात आली.अद्याप केंद्र सरकार कामगार मंत्री अर्थमंत्री इपीएफओ कार्यालय निर्णय घेत नसल्याने व त्यासाठी दि १२ डिसेंबर रोजी इपीएस ९५ पेन्शन धारकांचे देशव्यापी आंदोलन नवी दिल्ली जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आले आहे.

त्याची तयारी व आतापर्यंत पेन्शनवाढी संबंधी केलेल्या कायदेशीर प्रयत्नांचे आदी माहिती देण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता चेतना मंगल कार्यालय साकरवाडी ता:कोपरगाव येथे पेन्शन धारकांचा मेळावा महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूर वतीने आयोजित करण्यात आला असून मेळाव्यात निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समिती राष्ट्रीय संघटन नागपूर अध्यक्ष प्रकाश येंडे, म.राज्य पेन्शनर संघटना श्रीरामपूर अध्यक्ष एस एल दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकणी तसेच बाबुराव दळवी नगर,,बाबासाहेब गाढे, कोपरगाव,अंकुश पवार राहुरी,भागीनाथ काळे नेवासा,शिवाजीराव कोकाटे, कोपरगाव,रामदास सोनावणे साकरवाडी,आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.सन २०१२ मध्ये खा भगतसिंह कोशियारी समितीने पेन्शन वाढीचा अहवाल सादर केला तो केंद्र सरकारने स्वीकारला नाही.तो स्वीकारला असता तर आज सर्वाना रु ९०००/-अधिक महागाई भत्ता अशी पेन्शन मिळाली असती.२० एप्रिल २०२३ व २९ ऑगस्ट २०२३ लोकसभा सेक्रेटरीयेट दिल्ली अडीशनल डायरेक्टर यांनी पेन्शन धारकांची बैठक आयोजित केली होती.त्या बैठकीत किमान रु ३०००/- पेन्शन अधिक महागाई भत्ता द्यावा अशी शिफारस केली,अद्य्पा निर्णय न झाल्याने अनेक आंदोलने केली.आदी माहिती देण्यात येणार आहे.तरी मेळाव्यास जिल्ह्यातील पेन्श्नधारकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आर डी सोनावणे, बाबूलाल पठाण, गोरक्षनाथ आहेर,भाऊसाहेब कोल्हे,हिम्मत भुजंग,आदींनी केले आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी-  स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close