shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.बाबुराव उपाध्ये यांना मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा संत साहित्य पुरस्कार प्रदान


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांना  निगडी प्राधिकरण पुणे येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा संत साहित्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


निगडी प्राधिकरण पुणे येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त संत साहित्य पुरस्कार वितरण प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या  'भारतीय कुंभार समाजातील संत 'ह्या ग्रन्थास संत साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आल.पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या ग्रंथलेखक आणि प्रकाशक यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अभ्यागत म्हणून बृहन महाराष्ट्र पुणे येथील कॉलेज ऑफ कॉमर्सचे माजी रजिस्ट्रार डॉ. अजित कुलकर्णी, प्रकाशिका डॉ. स्नेहल तावरे, डॉ. सुधाकर नायगावकर, प्रा.   नंदकिशोर कुऱ्हे,भूमी फौंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. कैलास पवार, साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील,ह. भ. प.अशोक गोरे, कवी विलास कुंभार,मातृमंदिर संस्थेचे अध्यक्ष नितीनभाई कारीआ, कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे, कार्यवाह मनोज देवळाळकर, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी,प्रा. अनिता आढाव, साहित्यिक विलास कुंभार, ह.भ. प. अशोक गोरे आदीसह संतगण,अभ्यासक, नवनगर विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.डॉ. उपाध्ये यांनी उपस्थित पाहुण्यांचा  'भारतीय कुंभार समाजातील संत' पुस्तकाच्या प्रती भेट देऊन सत्कार केले.  यावेळी प्रकाशिका डॉ. स्नेहल तावरे, प्रमुख अभ्यागत डॉ. अजित कुलकर्णी, परीक्षक आणि संयोजकांनी सांगितले की २८ संत पुस्तकापैकी गट क्र.एक मधील प्रथम तीनमधील चिंतनपर, विवेचनपर, गट क्र.मधील संतचरित्रपर,ललित, काही विशेष, काही उत्तेजनार्थ असे पुरस्कार देण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांना प्रथम गटामध्ये असलेल्या संत साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा 'भारतीय कुंभार समाजातील संत' हा ग्रन्थ दुर्मिळ असा संशोधनपर ग्रन्थ आहे, संत गोरा कुंभार एवढे संत माहीत होते परंतु डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी भारतीय विविध प्रांतातील कुंभार समाजातील संतांचा आणि महात्म्यांच्या घेतलेला शोध नाविण्यपूर्ण असल्याचे अनेकांनी सांगितले.या ग्रन्थास पुरस्कार लाभल्याबद्दल श्रीरामपूर तालुका पेन्शनर्स असोशिएशन,ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावातर्फे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, उपाध्यक्ष दिनकरराव पोखरकर, प्राचार्य टी. ई. शेळके,प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,के. पी. बोरुडे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळेसर,मेजर नंदकुमार सैंदोरे,प्रा. सौ.पल्लवी सैंदोरे, प्रा. शिवाजीराव बारगळ,लेविन भोसले, दामोदर जानराव आदिंनी सत्कार केले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्वांचे आभार मानले.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close