श्रीरामपूर प्रतिनिधी:
दिवाळी सण म्हणजे मानवी संस्कृतीची विविध अंगाने केलेली आराधना होय, अशा दिवाळीचा साहित्यिक शब्दोत्सव वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे साजरा करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी दिली.
श्रीरामपूर परिसरातील इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पाडवा हा विविध साहित्यिक उपक्रमाने संपन्न झाला.यावेळी अध्यक्षस्थानी विधिज्ञ रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते.प्रारंभी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्व मान्यवर पाहुणे,साहित्यिकांना 'साहित्यशोध 'हा संतसाहित्य ग्रन्थ देऊन सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकामधून १९९० पासून साहित्य प्रबोधन मंच आणि २००६ पासून वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या साहित्य चळवळीचा आढावा घेतला.साहित्यिक डॉ. रामकृष्ण जगताप यांनी 'साहित्य आणि संमोहन 'या विषयावर विस्तृत विवेचन करून कथा लेखनाचे प्रसंग सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये, संगीता फासाटे यांनी 'दिवाळी'कविता सादर केल्या. माजी प्राचार्य किसनराव वमने यांनी 'चिंगळ्या 'ह्या कथेची निर्मिती जन्मकथा सांगून कथा सादर केली. माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील यांनी 'माझे नाट्यलेखन आणि अनुवादनिर्मिती 'याविषयी मनोगत व्यक्त केले.विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या सहवासात साहित्याची गोडी निर्माण झाली तर डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्यामुळे अनेक पुस्तके प्रसिद्ध झाल्याचे सांगून आत्मचरित्र लेखन प्रसंग विशद केले. प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी 'माझी भाषणे आणि वाचन संस्कृतीचे संस्कार 'याविषयी विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके, म्हणाले, मानवाची निर्मिती ही निसर्गाची सर्वश्रेष्ठ कला असून असा माणूसच माणसाला घडविण्याचे कार्य करतो,आपल्या जीवनात कोणती व्यक्ती कधी येईल ते सांगता येत नाही.डॉ. बाबुराव उपाध्ये हे साहित्यिकांचे प्रेरणास्थान बनले. १९७८ पासून ते विद्यार्थी दशेपासून साहित्य चळवळीत सहभागी आहेत.अनेकांनी आपल्या साहित्यनिर्मितीला आणि संवादकौशल्याला डॉ. उपाध्ये हेच कसे कारणीभूत आहेत, हे प्रामाणिकपणे अनुभवातून सांगितले, श्रीरामपुरात अनेकांच्या योगदानातून साहित्य आणि साहित्यिक चळवळ सुरु झाली, नवी पिढी हे कार्य पुढे नेत आहे, वाचन संस्कृती प्रतिष्ठान हे शांतपणे, देवघरातील समईसारखे श्रद्धेने, स्वखर्चाने साहित्यिक कार्य करीत असल्याचे सांगून हाच आदर्श सुखदेव सुकळे,डॉ. रामकृष्ण जगताप,डॉ. शिवाजी काळे,प्रा. शिवाजीराव बारगळ, संगीता फासाटे करीत आहेत, त्यामुळे ही साहित्यसेवा म्हणजे ज्ञानभक्तीची आराधना असल्याचे सांगितले, डॉ. जगताप यांच्या संकल्पनेतील 'श्रीरामपूर साहित्य परिषद 'हे कार्य जोमाने पुढे नेईल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानच्या खजिनदार सौ. मंदाकिनी बाबुराव उपाध्ये, गणेशानंद उपाध्ये,निर्मिक उपाध्ये यांनी केले.
सूत्रसंचालन कवयित्री संगीता फासाटे /कटारे यांनी केले तर वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या सचिव सौ.आरती गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

