shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंदिर,पुस्तक आणि सेवाकार्य माणसातल्या चांगुलपणाला प्रेरणा देतात = प्राचार्य टी. ई. शेळके


श्रीरामपूर प्रतिनिधी:
माणसाने माणुसकीचे जीवनसूत्र आपल्या विचार,आचार आणि विविध माध्यमातून सांगितले आहे, मंदिर,पुस्तक आणि सेवाकार्य ही ह्या संस्कृती जीवनसूत्राची उदाहरणे आहेत,ती माणसाला चांगुलपणाची प्रेरणा देतात, मनातले देवत्व जागे ठेवतात, असे विचार माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले. 

  श्रीरामपूर येथील इंदिरानगर मधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या :समाजचिंतन ', 'मातृपितृ देवोभव 'आणि सुखदेव सुकळे यांच्या उसगांवचा संतमहिमा या पुस्तकावर परिसंवाद आणि प्रा. शिवाजीराव बारगळ आणि माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे यांच्या सेवाकार्याचा सन्मान असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.त्याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. 


प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे म्हणाले,  पुस्तके ही माणसाची बौद्धिक, भावनिक मंदिरे आहेत तर मंदिरे ही भक्ती आणि सद्गुणांची निर्मितीस्थळे आहेत.माणूस हा भावनाशील, श्रद्धाशील प्राणी आहे.सेवाकार्य करणाऱ्या व्यक्ती ह्या वाटेवरच्या प्रकाशज्योती आहेत.त्या वादळ वाऱ्यात जपल्या पाहिजेत, अडूसष्ट वयाची वाटचाल करणारे प्रा. शिवाजीराव बारगळ यांचे सेवाकार्य सुरु आहे.डॉ. उपाध्ये यांनी प्रा. बारगळसर यांनी आत्मचरित्र लिहिणार असल्याचे सांगितले.प्राचार्य डॉ. गागरे यांनी पुस्तकवाचन केले तर मनाची बौद्धिक, भावनिक श्रीमंती वाढते असे सांगितले.प्राचार्य शेळके यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांचं वाचन चळवळ आणि पुस्तकनिर्मिती ही मानव पूजा असल्याचे सांगून प्रा. बारगळ व सुभाष वाघुंडे यांच्या कार्याचा गौरव केला.सुभाष वाघुंडे, सौ. अरुणाताई बारगळ, कु. हर्षला बारगळ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. उपाध्ये यांनी केले. शुभम नामेकर यांनी नियोजन केले तर दत्तात्रय खिलारी यांनी आभार मानले.
*पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव

सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close