shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान महारेशीम अभियान २०२३ चे आयोजन


अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
 वस्त्रोद्योग विभागांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी हमखास व शाश्वत उत्पन्नाची हमी देणाऱ्या रेशीम वाढीसाठी राज्यात दरवर्षी महारेशीम अभियान राबवून नवीन शेतकऱ्यांची निवड करण्यात येते. 

सन २०२४-२५  मध्ये रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीसाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२३ दरम्यान महारेशीम अभियान २०२३ राबविण्यात येणार असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
रेशीम उद्योग योजनेच्या माहितीबाबत तसेच नाव नोंदणीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी रेशीम विकास अधिकारी श्रेणी-१, जिल्हा रेशीम कार्यालय, पितळे कॉलनी, महागणपती मंदिराशेजारी, नागापूर दूरध्वनी क्र. 0241-2428546 येथे संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close