क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पांडूरंग (तात्या) शिंदे व इतर मान्यवर यांनी धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे या मागणीसाठी बारामती येथील उपोषण ठिकाणी भेट देऊन दिला पाठिंबा.
इंदापूर प्रतिनिधि: धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे या मागणीसाठी बारामती येथे गुरुवार दि. ९ नोव्हेंबर २०२३ पासून धनगर समाजाचे प्रतिनिधी चंद्रकांत वाघमोडे हे आमरण उपोषणास बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे. समाजामध्ये या विषयीची भावना तीव्र होत चाललेली आहे. उपोषणकर्त्याच्या मागणीला बळ देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पांडूरंग (तात्या) शिंदे तसेच सामजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, तानाजी भोंग, पंकज राऊत व रोहित बनकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग बारामती,देवेंद्र बनकर जिल्हा उपप्रमुख शिवसेना शिंदे गट यांनी बारामती येथे भेट देऊन पाठिंबा दिला.

